पुन्हा

का कुणास ठाऊक पण त्या दिवशी त्याला भेटायचं ठरवलं.
काही विशेष!
काहीच नाही.....
न भेटण्याचा निर्णय जसा अचानक आणि अर्थहीन तसाच भेटण्याचाही.
त्याला का भेटत नव्हतॉ? असा जर कोणि प्रश्न विचारला तर त्याला उत्तर जसे नाही तसेच मी त्याला का भेटतोय यालाही नाही.

कुठे भेटायचं तर सुजाताला...
कारण?
काहीच नाही.. केवळ भेटायला 'कारण' म्हणुन.

अडीच वर्षांनंतरचा "तोच" क्षण.
सगळच अनिश्चित..
अगदी पहील्या सारखं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा