का कुणास ठाऊक पण त्या दिवशी त्याला भेटायचं ठरवलं.
काही विशेष!
काहीच नाही.....
न भेटण्याचा निर्णय जसा अचानक आणि अर्थहीन तसाच भेटण्याचाही.
त्याला का भेटत नव्हतॉ? असा जर कोणि प्रश्न विचारला तर त्याला उत्तर जसे नाही तसेच मी त्याला का भेटतोय यालाही नाही.
कुठे भेटायचं तर सुजाताला...
कारण?
काहीच नाही.. केवळ भेटायला 'कारण' म्हणुन.
अडीच वर्षांनंतरचा "तोच" क्षण.
सगळच अनिश्चित..
अगदी पहील्या सारखं...
तो
अडीच वर्षांपुर्वीची ओझरती भेट..
१२ वीचा विद्यार्थी वाटावा असा 'तो'
आणि निवांत job मुळे सैलावलेला मी..
केवळ काही मिनीटांची भेट..
पुन्हा भेटण्याचे एकमेकांना दिलेले वचन,
अगदी अनिश्चीत...
येणार्या दिवसांसारखे, नव्हे काही वर्षांसारखे..
........
१२ वीचा विद्यार्थी वाटावा असा 'तो'
आणि निवांत job मुळे सैलावलेला मी..
केवळ काही मिनीटांची भेट..
पुन्हा भेटण्याचे एकमेकांना दिलेले वचन,
अगदी अनिश्चीत...
येणार्या दिवसांसारखे, नव्हे काही वर्षांसारखे..
........
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)